चेहऱयावर स्वतःच टोचून घेते इंजेक्शन
अनेक शस्त्रक्रिया करवून घेण्याचा प्रकार
प्रत्येकाला स्वतःच्या शरीरात हवा तसा बदल करण्याचा अधिकार आहे. जगात सर्वात मोठे गाल असलेल्या एका मॉडेलने अनेक शस्त्रक्रिया करवून घेत स्वतःच्या गालांना पंप केले आहे. या मॉडेलचे नाव अनास्तासिया पोकरेश्चुक आहे. सर्वात मोठय़ा आकाराचे गाल असूनही अलिकडेच तिने स्वतःच्या गालांना पुन्हा पंप केले आहे. यामुळे तिचा न्यू लुक पुन्हा चर्चेत आला आहे.
33 वर्षीय अनास्तासिया युक्रेनच्या कीव्ह येथे राहणारी आहे. 20 वर्षांची असताना तिचा चेहरा सर्वसामान्यांसारखा होता. परंतु नंतर तिने स्वतःच्या चेहऱयात अनेक बदल करवून घेतले. तिने स्वतःच्या गालांना पंप करण्यासाठी अनेक इंजेक्शन्स टोचून घेतली. यामुळे इतक्या वर्षांनी तिचा पूर्ण लुकच बदलला आहे.

इन्स्टाग्रामवर स्वतःच्या चाहत्यांसोबत तिने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती जबडय़ात इंजेक्शन टोचून घेताना दिसून येते. या सर्व प्रकारामुळे तिच्या चेहऱयावर प्रचंड वेदना होत असतात. वयाच्या 26 व्या वर्षी तिने चेहऱयावर सौंदर्याचे आणि सर्जिकल प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत तिने याकरता लाखो रुपये खर्च केले आहेत.
स्वतःच्या लुकबद्दल प्रेम
मला माझ्या या लुकबद्दल प्रेम असल्याचे ती इंजेक्शन टोचून घेतल्यावर सांगते. याचबरोबर तिने माथ्यावर काही बदल केले आहेत. माझा चेहरा लोकांना विचित्र वाटत असला तरीही मला याबद्दल कुठलीच समस्या नसल्याचे तिचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर लोकांनी तिच्यावर सडकून टीका देखील केली आहे. पूर्वी तिला याचा त्रास व्हायचा, परंतु आता ती याकडे कानाडोळा करते. औषधे आणि कॉस्मेटिक सर्जरी नुकसान पोहाचू शकते याची तिला जाणीव आहे.









