लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार विरोधात भाजप आणि निजद असा सामना अधिवेशनात पाहायला मिळाला.
विरोधकांनी कायदा सुव्यवस्था, लिंगायत आरक्षण, ऊस उत्पादक, दुष्काळ आणि उत्तर कर्नाटक विषया वरील प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा झाली. तसेच विविध महत्त्वाची विधेयके देखील संमत करण्यात आली आहेत. राज्यात दुष्काळ,भीषण पाणी टंचाई असताना बेळगावात अधिवेशन होणार की नाही याबाबत चर्चा होती.मात्र अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. चार डिसेंबर पासून अधिवेशन सुरू झाले.या अधिवेशनाची आज सांगता होणार आहे.अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांनी वाढविले जावे किंवा एक महिना अधिवेशन व्हावे अशी विरोधी पक्ष नेत्यांनी सातत्याने मागणी केली.मात्र सरकार तर्फे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज शुक्रवारी दुपारीच अधिवेशनाची सांगता होईल अशी शक्यता आहे.एकूण 10 दिवसाच्या या कर्नाटक हिवाळी अधिवेशना दरम्यान 68 आंदोलने व निदर्शने झाली तर 17 विविध संघ – संस्थांच्या वतीने सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









