नाबाद 67 धावा व 1 बळी, गुडाकेश मोती : 22 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान विंडीजने द. आफ्रिकेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात विंडीजने द. आफ्रेकचा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात विंडीजच्या रॉस्टन चेसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 207 धावा जमवल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 20 षटकात 7 बाद 191 धावापर्यंत मजल मारली.
विंडीजच्या डावामध्ये रॉस्टन चेसने 38 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 67, कर्णधार किंगने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36, मेयर्सने 16 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 32, फ्लेचरने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 29, शेफर्डने 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 26 धावा जमवल्या. विंडीजच्या डावात 14 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेतर्फे पीटर, फेलोकेवायो, एन्गिडी यांनी प्रत्येकी दोन गडी तर नॉर्जेने एक गडी बाद केला. विंडीजच्या पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 51 धावा जमवतान एक गडी गमाविला. विंडीजचे अर्धशतक 36 चेंडूत, शतक 68 चेंडूत, दीडशतक 95 चेंडूत आणि द्विशतक 111 चेंडूत फलकावर लागले. चेसने 2 षटकार आणि 5 चौकारासह 30 चेंडूत अर्धशतक झळकवले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात डिकॉकने 17 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 41, हेन्ड्रिक्सने 18 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 34, रिक्लेटोनने 17 चेंडूत 2 चौकारांसह 19, ब्रिझेकने 12, कर्णधार व्हॅन डेर ड्युसेनने 22 चेंडूत 2 षटकारासह 30, पीटरने 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमवल्या. द. आफ्रिकेला 24 अवांतर धावा मिळाल्या. डिकॉक आणि हेन्ड्रिक्स यांनी सलामीच्या गड्यासाठी 5 षटकात 81 धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेच्या डावात 9 षटकार आणि 11 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेने पॉवर प्लेच्या 6 षटकात 85 धावा जमविताना दोन गडी गमवले. त्यांचे अर्धशतक 25 चेंडूत, शतक 51 चेंडूत तर दीडशतक 96 चेंडूत फलकावर लागले. विंडीजतर्फे मोतीने 22 धावात 3 तर चेस, अकिल हुसेन आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 7 बाद 207 (चेस नाबाद 67, किंग 36, मेयर्स 32, फ्लेचर 29, शेफर्ड 26, पीटर, फेलुकेवायो, एन्गिडी प्रत्येकी दोन बळी), द. आफ्रिका 20 षटकात 7 बाद 191 (डिकॉक 41, हेन्ड्रिक्स 34, ड्युसेन 30, रिक्लेटोन 19, पीटर नाबाद 10, अवांतर 24, मोती 3-22, चेस, अकिल हुसेन, शेफर्ड प्रत्येकी एक बळी).









