गोव्यातील दोन्ही खासदार यंदा भाजपालाच द्या : फर्मागुडीतील जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
फोंडा ; भाजपाने गोव्याला राजकीय स्थैर्य आणि गतिमान विकास दिला. जो यापूर्वीच्या काँग्रेस सरकारला कधीच शक्य झाला नाही. गोवा प्रदेश आकाराने भलेही छोटा असेल, पण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी तेवढाच सक्षम आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आहे. यावेळी आम्हाला अर्धा अर्धा नको संपूर्ण गोवा हवा आहे. मागील निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दूर कऊन उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपाला शंभर टक्के विजय मिळून देण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथील जाहीर सभेत केले. लोकसभेच्या 2024 सालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दक्षिण गोव्यासाठी प्रदेश भाजपातर्फे रविवारी सायंकाळी फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. हजारो कार्यकर्त्यांसह विराट जनसुमदायाला संबोधित करताना अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. आपल्या अठरा ते वीस मिनिटांच्या भाषणात शहा यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून गोवा राज्यात भाजपाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेले विकासाचे प्रकल्प व योजनांवर भर दिला. गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील खनिज खाणी वर्षभरात जोमाने सुऊ होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. सभेपूर्वी त्यांनी भाजप गाभा समितीची बैठक घेतली. तसेच भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे आमदार, भाजपचे आमदार, मंत्री यांच्याकडून आढावा घेतला आणि त्यांना मार्गदर्शनही केले.
मोदी सरकारकरकडून गोव्याला वर्षाकाठी तीन हजार कोटी
काँग्रेसवर निषाणा साधताना अमित शहा म्हणाले, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात गोव्यासारख्या छोट्या राज्यांना नेहमीच दुय्यम महत्त्व दिले गेले. सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या सरकारकडून गोव्याला विकासासाठी वर्षाकाठी केवळ ऊ. 432 कोटींचा निधी मिळत होता. मोदी सरकार सत्तेवर येताच गोव्याच्या विकासासाठी वर्षाकाठी तीन हजार कोटी देण्यास सुऊवात केली. भाजपाच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात अटल सेतू, तसेच ऊ. 2700 कोटींचा नवीन जुवारी पूल, तीन हजार कोटींचा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोळी विमानतळासाठी ऊ. 500 कोटींचा निधी, राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारासाठी ऊ. 6000 कोटी, गोवा शिपयार्डसाठी 32 हजार कोटींची योजना या साधनसुविधांसह ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी ऊ. 500 कोटींची तरतूद, आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी बांबोळी येथे कॅन्सर इस्पितळ, शिक्षण क्षेत्रात आयआयटी, एनआयटी, नॅशनल फॉरन्सिक महाविद्यालय अशा विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला.
वर्षभरात खाण उद्योग येणार पूर्वपदावर
अमित शहा यांनी म्हादईच्या मुद्याला बगल दिली असली तरी दक्षिण गोव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खाण उद्योगावर भाष्य केले. न्यायलयाच्या एका आदेशामुळे गेली दहा वर्षे बंद असलेला गोव्यातील खाण उद्योग स्थानिक भाजपा नेतृत्त्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सातत्याने पाठपुरावा केल्याने पूर्ववत सुऊ झाला आहे. खाण मालाचा दोन टप्प्यात लिलाव झाला असून आठ पिठे वितरीत करण्यात आली आहेत. येत्या वर्षभरात खाण उद्योग पूर्ववत सुऊ होत असून येथील उद्योगांना चालना मिळणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या दशसुत्री कार्यक्रमाची प्रशंसा
राज्य सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या स्वयंपूर्ण गोवासह दशसुत्री कार्यक्रम व अन्य योजनांचे अमित शहा यांनी कौतुक केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सामान्य जनतेला सरकारी अधिकाऱ्यांकडे जावे लागत नाही. प्रशासन तुमच्या दारी हा संपूर्ण देशातील पहिला प्रयोग गोव्यातच यशस्वी झाला आहे. हीच भाजपाची अंत्योदय निती व मोदी सरकारची गरीब कल्याण योजना आहे. देशाला शांती, सुरक्षा, विकास, समृद्धी केवळ मोदी सरकार देऊ शकतात, असे ते म्हणाले.
कर्नाटकात भाजपा बहुमताने विजयी होणार
काँग्रेसवर पुन्हा निषाणा साधताना देशाच्या विकासापेक्षा परिवारवाद, वंशवाद आणि जातीवादाला प्रोत्साहन देणारा हा पक्ष असल्याची टिकाही त्यांनी केली. उत्तर पूर्वेकडील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालया हे काँग्रेसचे बालेकिल्ले भाजपाने जिंकले आहेत. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमताने विजयी होणार असल्याची घोषणाही अमित शहा यांनी केली.
पर्रीकर हा देशाचा गौरव
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचेही त्यांनी आपल्या भाषणातून स्मरण केले. एका छोट्या राज्यातून देशाचे संरक्षणमंत्री बनलेले पर्रीकर हे देशाचा गौरव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. साधेपणा, सरळता व प्रामाणिकपणाचे प्रतिक असलेल्या पर्रीकरांना गोमंतकीयांच्या मनात कायम स्थान असेल, असेही त्यांनी नमूद केले.
आदीवांसीना विधानसभेत मिळणार आरक्षण : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणातून आदीवासींसाठी विधानसभा मतदार आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणी राजकारण कऊ नये, असा इशारा दिला. सन 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकार गोव्यातील आदिवासींना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात यापुढे प्रादेशिक भाषांतून परीक्षा देण्याच्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचे त्यांनी अभिनंदन केले. या निर्णयामुळे कोकणी भाषेतून गोमंतकीयांना परीक्षा देता येणार आहे. अंत्योदय तत्त्वावर काम करणाऱ्या गोव्यातील भाजपा सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोचविल्या आहेत. डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दक्षिण व उत्तर या दोन्ही जागांवर भाजपाचे कमळ फुलविण्याचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
सदानंद तानावडे यांनी डबल इंजिन सरकारमुळेच गोव्यात मोठे विकासाचे प्रकल्प उभे राहिल्याचे सांगितले. सन 1999 व त्यानंतर 2014 अशा दोनवेळा भाजपाने दक्षिण गोव्यातील लोकसभेच्या जागा जिंकल्या. मागील निवडणुकीत ज्या काँग्रेस खासदारांना जनतेने संधी दिली ते पाच वर्षांत एकही प्रकल्प सोडा पण जनतेला भेटलेही नाहीत. दक्षिणेत पुन्हा भाजपाचा झेंडा उभारण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, येणाऱ्या लोकसभेत चारशे जागा जिंकण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट्या आहे. ज्या 140 जागा मागच्या निवडणुकीत जिंकता आल्या नाहीत, त्याकडे भाजपाने विशेष भर दिला असून त्यात दक्षिण गोव्यातील जागेचाही समावेश आहे. त्यासाठीच अमित शहांनी या जाहीर सभेच्या माध्यमातून राज्यातील भाजपा कार्यकत्यांना आत्तापासून कामाला लागण्याची प्रेरणा दिली आहे. दिगंबर कामत, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, माविन गुदिन्हो, अॅड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, बाबू कवळेकर यांच्यासह अन्य नेत्यांची यावेळी भाषणे झाली. केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी दक्षिण व उत्तर गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. सभापती रमेश तवडकर, आयोग्यमंत्री विश्वजित राणे, बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, कृषीमंत्री रवी नाईक, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, मगो नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह आमदार दिगंबर कामत, देविया राणे, जेनिफर मोन्सेरात, डिलायला लोबो, ज्योसुआ डिसौजा, ऊडॉल्फ फर्नांडिस, आलेक्स सिकेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, प्रवीण आर्लेकर, चंद्रकांत शेटये, गणेश गावकर, उल्हास तुयेंकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी आमदार तथा प्रदेश भाजपाचे सरचिटणिस दामू नाईक यांनी केले.









