सातारा प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सातारा दौरा करत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टिकास्त्र डागले. राष्ट्रवादीवर टिका कराताना त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टिप्पणी केली . तसेच शरद पवार हेच भोंदूबाबा आहेत हे सगळ्या देशाला माहिती आहे अशी जहरी टिका त्यांनी केली.
सातारा दौऱ्यावर त्यांनी सर्वप्रथम जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव साहेबांची शिवसेना यांच्यावर जोरदार टीकास्त्र टाकले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि उद्धव साहेबांची शिवसेना यांना उमेदवार मिळणार नाहीत.असे त्यांनी म्हटलंय.
पत्रकारांनी अजितदादांच्या नॉट रीचेबल असण्याच्या संदर्भात विचारले असता “अजितदादा जे काही करतील हे फक्त त्यांनाच माहिती असतं आणि तेच याचे उत्तर योग्य देऊ शकतील.” राष्ट्रवादीच घड्याळ बारामतीत बंद पाडणार आहे असेही ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, शिंदे- फडणवीस १८ तास काम करणारे दोन नेते सरकारला मिळाले आहेत. मागील अडीच वर्षातील जी कामे मागे टाकली व पुढील अडीच वर्षे अशी पाच वर्षातील कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. २०२४ पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही एकत्र आल्याने ‘धन्यवाद मोदीजी’ अशी २ कोटी पत्र पंतप्रधान मोदींना लिहिले जाणार आहेत. त्यामुळे देवेन्द्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी केंद्राकडे जातील त्यावेळी जास्तीत जास्त लाभ राज्याला मिळण्यासाठी प्रयत्न होतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आमचं वर्चस्व राहणार असून ग्रामपंचायत निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये २०० पेक्षा जास्त आणि ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
पुढे बोलताना, “प्रतापगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक संघटनांचा सहभाग आहे. उद्धव ठाकरे यांनी मतांचे राजकारण असल्यामुळे त्यांनी अतिक्रमण काढले नाही. पण ते आमचं सरकार येताच अफजलखान कबरीच अतिक्रमण काढण्यात आल आहे. अडीच वर्षे सर्व डिपार्टमेंट असतानाही तुम्ही कारवाई केली नाही आता सत्ता नसताना कल्पोकल्पपित आरोप उद्धव ठाकरे करत आहेत. हिंदुत्ववादी संघटना यांनी यापूर्वी अफजल खान कबर काढण्यासाठी आंदोलने केली होती ती गुन्हे मागे घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.” असेही ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यात दोन भाजपचे आमदार आहेत ही संख्या वाढून २०२४ मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे भाजपचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. असेही ते म्हणाले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, अतुल भोसले आदी उपस्थित होते.








