पूर्वेच्या दिशेने सर्व घरांची समोरील बाजू
अमेरिकेतील आयोवा प्रांतात एक शहर असून ते हिंदू प्रथांचे पालन करणारे आहे. यात राहणारे लोक परस्परांशी संस्कृत भाषेत संवाद साधतात आणि दिवसातून दोनवेळा ध्यानधारणा करतात. या शहराचे नाव महर्षी वैदिक सिटी असून ते अन्य कुठल्याही शहराप्रमाणे नाही. येथील सर्व वास्तूंची समोरील बाजू हे पूर्व दिशेला आहे. येथे नॉन-ऑर्गेनिक फूडवर बंदी आहे. याला अमेरिकेतील ‘मोस्ट अनयुजुअल टाउन’ म्हणजेच ‘सर्वात विचित्र शहर’ म्हटले जाते. अभिनेत्री ओप्रा विन्फ्रेने कधीकाळी महर्षी वैदिक सिटीला अमेरिकेतील सर्वात विचित्र शहर संबोधिले होते. या शहराची स्थापना 2011 मध्ये ट्रान्सेडँटल मेडिटेशनचे संस्थापक महर्षी महेश योगी यांनी केली होती. परंतु हे आयोवातील सर्वात नवे शहर ठरू शकते. हे शहर वेदांमधील तत्वांवर आधारित आहे. महर्षी वैदिक सिटीत राहणारे बहुतांश लोक संस्कृत भाषेत पारंगत आहेत. येथे लोकांचा दिनक्रम महर्षी महेश योगी यांच्या शिकवणीवर आधारित असतो. याच्या अनुकरणामुळे जगात शांतता नांदू शकते असे त्यांचे मानणे होते.
योगिक फ्लाइंग योगा
या शहरात राहणारे लोक दिवसात दोनवेळा ध्यानधारणा करतात. यात योगिक फ्लाइंग देखील सामील आहे. यात लोक क्रॉस लेग्ड बसून हवेत झेप घेतात. अनेक लोक स्वत:च्या दैनंदिन ध्यानधारणेसाठी महर्षी गोल्डन डोम्सच्या दिशेने जात असतात. गोल्डन डोम्स महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या परिसरातील जुळ्या इमारती असून त्या 1980 अन् 1981 मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. यातील एका इमारतीत पुरुष तर दुसऱ्या इमारतीत महिला ध्यानधारणा करतात. 2020 च्या जनगणनेनुसार केवळ साडेतीन चौरस मैलाच्या भूमीवर स्थित हे शहर आता 277 लोकांचे घर ठरले आहे. पूर्ण शहराला महर्षी वैदिक वास्तुकलेनुसार डिझाइन करण्यात आले आहे. यातील सर्व इमारतींचे मुख्य द्वार हे उगवत्या सूर्याच्या दिशेने आहे.









