ठेकेदार, प्रशासक, प्रशासन यांचा नाही समन्वय
नागरिक त्रस्त ; दुसरीकडे निवडणुकीची लगीन घाई
【साटेली भेडशी प्रतिनिधी】
साटेली भेडशी ग्रामपंचायतीतील प्रशासक, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या योग्य समन्वय नसल्याने गेले सहा दिवस साटेली गावातील अनेक वाड्यावरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
सध्या साटेली भेडशी ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ग्रामपंचायतची बॉडी बरखास्त करण्यात आली असून हा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.यादरम्यान नळपाणी योजनेचे मागे सुरू असलेले काम पावसाळ्यात बंद होते. हे काम चालू आठवड्यात पुन्हा सुरु केले . यावेळी नवीन पाईपलाईन घालण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करताना जमिनीत असलेल्या जुन्या पाईलाईन मोठ्या प्रमाणात उखडल्या गेल्याने दुरुस्तीचे काम तात्काळ करणे कठीण असल्याने साटेली गावातील अनेक वाड्यांचा पाणीपुरवठा पाच ते सहा दिवस पूर्णपणे बंद असून येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून नदी, नाले, विहिरी याठिकाणी पाण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित हे काम करताना ठेकेदार, प्रशासक, प्रशासन यांचा समनव्य नसल्याने नागरिकांवर पाणी टंचाईची वेळ आली आहे. नळपाणी योजनेच्या पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी अतिरिक्त कामगारांनी दुरुस्तीचे काम करावे तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.









