जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रकार
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी खोदाई सुरू आहे. त्यावेळी पाण्याची पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वारंवार अशा घटना याठिकाणी घडत आहेत. पाईप फुटून पाणी वाया जाऊ लागल्याने विविध कार्यालयातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्याचे कामकाज सुरू आहे. हे कामकाज अत्यंत संथगतीने सुरू आहे. एका बाजूचा रस्ता करण्यात आला आहे. आता दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई केली जात आहे. यावेळी पाण्याचे पाईप फुटत आहेत. सोमवारी पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात होते. त्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी धडपड करण्यात येत होती.









