The water of Moti Lake was diverted for the construction of the rock
सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या कटड्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे त्यासाठी तलावाचे पाणी कमी करण्यात यावे असे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेला दिले होते. त्यानुसार कटवड्याचे बांधकाम करण्यासाठी पालिकेने तलावाचे पाणी कमी केले आहे तलावाचे पाणी निम्म्यापेक्षा कमी झाल्याने उन्हाळ्यात त्याचा त्रास होणार आहे विशेषता पाण्याने तळ गाठल्यास डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार आहे . गेल्या वर्षी तलावाचा गाळ काढताना सावंतवाडी बांदा मार्गावरील रस्त्यावरील मोती तलावाचा कठडा कोसळला होता हा कोसळलेला कटडा लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत होती त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने 50 -50 लाखाच्या दोन निविदा काढल्या आहेत त्यामुळे सुरू केले आहे. मोती तलावाचा कटड्याचे काम करण्यात येणार आहे . मात्र ज्याच्यासाठी हा प्रकार घडला तो गाळ मात्र जैसे ते आहे त्याबाबत पालिका काय भूमिका घेते महत्त्वाचे ठरणार आहे हे काम करण्यापूर्वी गाळ काढला असता तर अधिक उचित झाले असते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









