वंटमुरी आश्रय कॉलनीतील गरीब कुटुंबाला फटका
बेळगाव : पावसामुळे घरावर ताडपत्री घालताना घराची भिंत कोसळल्याची घटना आश्रय कॉलनी, वंटमुरी येथे रविवारी दुपारी घडली आहे. या परिसरातील घरे जुनी झाली आहेत. त्यांना गळतीही लागली आहे. डागडुजी करताना भिंत कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. बसव्वा रुद्रप्पा चुळकी या राहात असलेले घर कोसळले आहे. बसव्वा व मुलगी दोघीच घरी राहतात. पावसाळ्याच्या आधी गळती बंद करण्यासाठी छतावर ताडपत्री घालताना रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही.









