वार्ताहर/किणये
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कावळेवाडी गावातील ओमानी मोरे यांच्या राहत्या घराची भिंत सोमवारी कोसळून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संतधार पावसामुळे पुन्हा नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
भिंत कोसळल्यामुळे त्यांच्या काही जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. प्रशासनाने सदर भिंतीची पाहणी करून त्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









