कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला ठोकले टाळे
कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यापासून थकले आहे. मागील वर्षभरापासून वेळेवर वेतन देण्यात येत नसल्याने सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन छेडून कॅन्टोन्मेंट च्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. परिणामी कामकाज ठप्प झाले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून गेल्या चार वर्षापासून शासनाकडून निधी मंजूर केला जात नाही विकास कामे आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण रखडले आहे निधी अभावी कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.









