वार्ताहर / नंदगड
मुडेवाडी ( ता. खानापूर )येथील लोहर प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत पावसामुळे रविवारी रात्री जमीनदोस्त झाली. रात्र असल्याने इमारती मध्ये कोणी नसल्याने कोणाच्याही जीविताला धोका पोहोचला नाही.
मुडेवाडी खानापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर गाव आहे. ग्रामस्थांनी श्रमदानाने व देणगी रूपाने रक्कम जमवून 1964 साली शाळेची एक वर्गखोली व 1982 साली दुसरी खोली बांधली होती. आज पर्यंत गावकऱ्यांनी बांधलेल्या इमारतीतच पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा सुरू होती. सध्या या शाळेत 22 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
वरील पैकी शाळेच्या एका खोलीची भिंत रात्री जमीन दोस्त झाली. तर उर्वरित एक खोली ती ही नादुरुस्त अवस्थेत आहे. तीच्या चारी बाजूच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. तर छप्पर नाददुरुस्त झाले आहे. छप्परावर प्लास्टिकचा कागद घालून शाळा सुरू आहे. शासनातर्फे शाळेसाठी एकही वर्ग खोली बांधण्यात आलेली नाही.
शाळेसाठी एक स्वयंपाक खोली सरकारतर्फे बांधण्यात आली आहे. या खोलीचे बांधकाम ही नित्कृष्ट दर्जाचे राहिल्याने गळती निर्माण झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









