भूगर्भातील लाटेमुळे वर आला भारताचा एक हिस्सा
पृथ्वीच्या अंतर्गत हिस्स्यात होत असलेल्या हालचालींमुळे खंडांमधील मध्यभागच्या हिस्स्यात उंच पठार निर्माण होतात, तर खंड जेव्हा तुटतात तेव्हा त्याच्या काठांवर उंच उंच पर्वत निर्माण होतात. हे तुटणे पृथ्वीच्या आत एक लाट निर्माण करते, जी हळूहळू आतील दिशेने जाते अणि पठारांना वर उचलते.
इंग्लंडच्या साउथहॅम्प्टन युनिव्हर्सिटीचे जियोसायंटिस्ट थॉमस जरनीन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. खंडीय भेगा विशाल पर्वतांना वरच्या दिशेने आणतात, पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली अणि इथियोपियन पठारला वेगळे करणारे पर्वत याचे उदाहरण आहे. हे पर्वत खंडांच्या मजबूत आणि स्थिर केंद्रांमधून वर येणाऱ्या अंतर्गत पठारांना वेढा घालून असतात. परंतु हे दोन्ही लँडस्केप फीचर्स सर्वसाधारणपणे 1-10 कोटी वर्षांच्या अंतराने निर्माण होत असतात. याचमुळे अनेक वैज्ञानिकांचे त्यांची निर्मिती वेगवेगळी झाली असल्याचे मानणे आहे. याकरता विविध प्रक्रिया झाल्या आहेत. हे नवे अध्ययन नेचर नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
भारताचा पश्चिम घाट
जरनॉन यांनी याच्या अध्ययनासाठी पृथ्वीचा अखेरचा महाखंड तुटल्यावर निर्माण झालेल्या भिंतीचे अध्ययन केले. यातील एक भिंत भारतात असून त्याला पश्चिम घाट म्हटले जाते. ही भूसंरचना 2000 किलोमीटर लांब आहे. ब्राझीलमध्ये हायलँड प्लॅट्यू 3 हजार किलोमीटर लांबीचा आहे. दक्षिण आफ्रिकेत सेंटल प्लॅट्यू हा 6 हजार किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजेच या पठारांखालील हिस्से अनेक किलोमीटर वर आले आहेत, यामुळे मँटलमध्ये आलेली लाट कारणीभूत आहे.
दर 10 लाख वर्षांनी….
जरनॉन यांच्या टीमने टोपोग्राफिक नकाशांद्वारे या ठिकाणांना एकत्र केले तेव्हा हे महाखंड वर येताना वेगळे झाल्याने निर्माण झाल्याचे समजले. कारण वर येणाऱ्या महाखंडांमुळे मँटलमध्ये डिस्टर्बन्स हाते. यामुळे तीव्र लाटा निर्माण होतात. या लाटा मँटलच्या आत पसरतात, यामुळेच हे पठार वर येतात, परंतु त्यांचा वेग अत्यंत मंद असतो. दर 10 लाख वर्षांमध्ये ते 15-20 किलोमीटरने वाढत असतात. याचमुळे पठारांचा आकार बदलत राहतो.









