ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापणा जानेवारीत होणार आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होऊ शकते, असे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले, 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. त्यानंतर 24 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्च्युअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दुतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठापणा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु आहे. प्राणप्रतिष्ठापनेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाईल.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिने आगोदर श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. आज अधिकृतपणे प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिराचा पहिला टप्पा 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहेत. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार आहे. ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.









