प्रतिनिधी
बांदा
महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने गेले दोन दिवस बांदा परिसरातील गावात वीजपुरवठा बंद होता. त्याच पार्श्वभूमीवर परिसरातील एका युवतीने इन्सुली गावाला शिवीगाळ करून एक रील तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. यात मालवणी मध्ये इन्सुली वासीयांना शिव्या घालत इन्सुली वाल्यांनी वीज टॉवरला आग घातली . अशी अगदी खालच्या शब्दात टीका केली. दरम्यान हे रिल्स पोस्ट होताच इन्सुली वासीय आक्रमक झाले. तर अशी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या युवतीवर कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी ग्रामस्थांनी केली. हे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच त्या युवतीने ते रिल्स डिलीट करून माफीची पोस्ट टाकली. मात्र त्या रिल्सचे व माफीच्या पोस्टची आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चा रंगली.
महावितरणचा उपकेंद्र इन्सुली गावात आहे गेले दोन दिवस याठिकाणी मोठा बिघाड झाला होता. यामुळे परिसरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता. संबंधित विभागाचे कर्मचारी दिवस रात्र याठिकाणी काम करत होते दरम्यान बांदा परिसरातील एका युवतीने इन्स्टाग्रामवर एक रिल्स तयार केले यार रिल्स वर आपली लाईट नाही म्हणून इन्सुली वाल्यानी टॉवरला आग घातली असे सांगताना तिची जीभ घसरली यात तिने मालवणी मधून अगदी खालच्या शब्दात शिवीगाळ केली. शनिवारी सायंकाळी हे इन्सुली येथील नेटकऱ्यांच्या लक्षात आले सोशल मीडियावर आपल्या गावाबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याने इन्सुलीवासिय संतप्त झाले . काहींनी तर तिच्या त्या रिल्सला कंमेंट देत तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. इन्सुलीतील शेकडो ग्रामस्थांनी बांदा पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. यावेळी येथील प्रभारी अधिकारी यांच्याशी बोलून सदर युवतीला समज द्या अशी मागणी करत तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी लेखी मागणी केली.मात्र ते रिल्स अंगलट येणार हे लक्षात येताच तिने ते डिलीट केले.तर काही वेळातच तिने संपूर्ण इन्सुली वासीयांची जाहीर इंस्टाग्रामवर माफी मागितली.









