पाचगणी प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरण, तलावांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.
संततधार पावसामुळे महाराष्ट्राच्या मिनी काश्मिरमधील वेण्णा लेक तुडूंब भरला आहे. हा तलाव आता ओसंडून भरून वाहताना दिसत आहे तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला बोट व्यावसायिक आपल्या बोटी किनाऱ्याला आणून ठेवताता. या बोटीदेखील आता वेण्णा लेकच्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरचा परिसर हिरवा गर्द झाला आहे. धुवांधार पाऊस, धुके, फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.