वॉशिंग्टन:
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या ताफ्यातील एका कारला रविवारी रात्री एका एसयुव्ही वाहनाने टक्कर मारल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अध्यक्ष बिडेन हे विलमिंग्टन डेलावेयर येथील स्वत:च्या प्रचार कार्यालयातून बाहेर पडत असताना ही घटना घडली आहे. बिडेन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जिल देखील होत्या. या दुर्घटनेत सुदैवाने कुणीच जखमी झालेले नाही. कारचालकाने चुकून अध्यक्षांच्या ताफ्यातील वाहनाला टक्कर दिली होती, असे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय पदासाठी निवडणूक होणार असल्याने सर्व संभाव्य उमेदवार प्रचारमोहिमेत व्यस्त आहेत. बिडेन देखील 2024 च्या प्रचार मोहिमेच्या मुख्यालयाचा दौरा करण्यासाठी येथे पोहोचले हेते. बिडेन आणि त्यांची डेमोक्रेटिक पार्टी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.









