न्हावेली / वार्ताहर
सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेला मळगाव टेमकरवाडी येथील समस्त राऊळ कुटुंबियातील आणि हाडुगावकर कुटुंबातील सुवासिनींचा गौरी पूजन व व्हवसा कार्यक्रम सुहासिनी महिलांच्या गर्दीत उत्साहात पार पडला.यनिमित्त सकाळी ढोल ताशांच्या गजरात विहिरीवरून वाजत गाजत गौरीचे आगमन झाले. त्यानंतर गौरीला नटवून तिचे विधिवत पूजन करण्यात आले. देवीची महाआरती पार पडली.आरतीनंतर व्हवसा कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी दरवर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला पहिला मान देण्यात येतो, त्याप्रमाणे ब्राम्हणांच्या साक्षीने त्यांचा व्हवसा प्रथम पार पडला.त्यानंतर उरलेल्या महिलांच्या व्हवसा कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे झाले. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ढोलांच्या गजरात वाजत गाजत गौरीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सुहासिनी महिलांसह छोटी बालके मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी झाल्या होते
Previous Articleलोणावळ्यात 2 मुलींचे अपहरण करून अत्याचार; 9 जणांवर गुन्हा
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg