सुकी मिर्ची, सुकी मासळी, मसाल्याची मोठ्या प्रमाणात खरेदी : स्थानिक आंबा मात्र बाजारपेठेतून गायब,,कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ राज्यातील आंब्याचा मार्केटवर कब्जा
वाळपई : पावसाळी जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंगळवारी वाळपईत आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याची चित्र पहावयास मिळाले. पावसाळ्यासाठी आवश्यक असलेली सुकी मासळी, सुकी मिरची, मसाला, यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. आश्चर्याची बाब अशी की सत्तरी तालुक्मयामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होत असतानाही सत्तरीचा आंबा मात्र बाजारातून गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्याऐवजी परराज्यातून येणाऱ्या आंब्याने मोठ्या प्रमाणात मार्केट निर्माण केले होते. सत्तरी तालुक्मयातील नागरिकांसाठी वाळपईचा आठवडी बाजार हा महत्त्वाचा असतो. दर आठवड्याला आवश्यक असलेले घरातील सामान या बाजारच्या वेळी खरेदी करण्यात येत असतात. या बाजारामध्ये अनेक वस्तू स्वस्त दरात मिळत असतात. यामुळे खास करून कामगार व शेतकरी बांधव बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत असतात.b पावसाळी आगमनाला अवघेच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे मंगळवारी हा शेवटचा आठवडा बाजार असण्याची शक्मयता असल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फातिमा कॉन्व्हेंट या रस्त्यावर व मासोर्डे गावात जाणाऱ्या रस्त्यावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र पहावयाचा मिळाले. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे या आठवडा बाजारात लाखो ऊपयांची उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुकी मिर्ची 300 ऊ ते 500 ऊ. प्रति किलो
मंगळवारच्या आठवडा बाजारात सुकी मिरचीचा दर प्रति किलो 300 ते 500 ऊपयाप्रमाणे होता. ही मिरची गावठी नाही. मात्र कर्नाटक भागातून ही मिरची विकण्यासाठी आणण्यात आली होती. ठीक ठिकाणी मिरचीचे ढिगारे पहावयास होते. त्याचप्रमाणे ग्राहक मोठ्या प्रमाणात ही मिरची खरेदी करताना दिसत होते. या संदर्भात मिरची विक्री करणारे अब्दुल्ला सराफ यांनी सांगितले की कर्नाटक भागातील ही मिरची आहे. या मिरचीला गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे या मिरचीच्या माध्यमातून गोव्यामध्ये लाखो ऊपयाचे उलाढाल होत असते. यंदा मिरचीचा दर काही प्रमाणात वाढला असला तरी महागाईच्या तुलनेमध्ये तो समाधानकारक असल्याचे अब्दुल्ला यांचे म्हणणे आहे.
सुकी मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी
पावसाळ्यामध्ये ताजे मासे मिळणे कठीण बनते. यामुळे पावसाळ्यात सुक्या मासळीवर समाधान मानावे लागते. यामुळे वाळपईच्या बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात सुखी मासळी विक्री करण्यात आली. यालाही ग्राहकाने चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बांगडे, दोडकारे ,खापी, सुखी सुंगठे अशा प्रकारच्या खरेदीला ग्राहकांनी विशेष पसंती दिल्याचे पहावयास मिळाले. पुढील तीन महिने सुक्मया मासळीवरच बेगमी करावी लागणार आहे.
परराज्यातील आंब्याचा मार्केटवर कब्जा
सध्या आंब्याचा मौसम सुरू आहे. यंदा ज्याप्रमाणे झाडांना मोहर आला होता ते पाहिल्यास सर्वसामान्यांना परवडणारा आंबा बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार अशी शक्मयता होती .मात्र ती शक्मयता फेल ठरलेली आहे. कारण आजच्या वाळपईच्या आठवडी बाजारामध्ये स्थानिक आंब्याच्या जागी परराज्यातील आंब्याने कब्जा केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. स्थानिक भागातील मानकुराद, केशर, रत्ना, आम्रपाली मालदेश, हापूस हा आंबा मात्र या मार्केटमधून गायब झाला. त्या जागेवर कर्नाटक, आंध्र प्रदेश ,तामिळनाडू केरळ ,या भागातील आंब्याने कब्जा केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान मात्र रासायनयुक्त आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. दर प्रति किलो 150 ते 200 प्रमाणे आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता.









