रशियाला शस्त्रास्त्रs पुरविल्याचा केला होता आरोप
वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेताल अमेरिकेचे राजदूत रुबेन ब्रिगेटी यांनी तेथील सरकारची बिनशर्त माफी मागितली आहे. ब्रिगेटी यांनी 11 मे रोजी एक वक्तव्य जारी करत दक्षिण आफ्रिकेवर रशियाला शस्त्रास्त्रs पुरविल्याचा आरोप केला होता. मागील वर्षी 6-8 डिसेंबरदरम्यान केपटाउनमध्ये एका रशियन जहाजावर शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा भरण्यात आल्याचे ब्रिगेटी यांनी म्हटले होते. या आरोपानंतर दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेच्या राजदूताला पाचारण केले हेते.
रशियाला शस्त्रास्त्रs विकल्याची कुठलीच नोंद नसल्याचे दक्षिण आफ्रिकेकडून म्हटले गेले हेत. राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी याप्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून अमेरिकेच्या राजदूताने केलेले आरोप फेटाळले होते. या आरोपांच्या पुष्टीदाखल अमेरिकेने कुठलेच पुरावे सादर केले नसल्याचे दक्षिण आफ्रिकेकडून नमूद करण्यात आले होते.
ब्रिगेटी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विदेशमंत्र्यांची भेट घेतली आहे. माझ्या वक्तव्याबद्दल चुकीची माहिती फैलावण्यात आली होती. चूक दुरुस्त करण्याची संधी मिळाल्याने मी आभारी आहे. दोन्ही देशांदरम्यान मजबूत भागीदारी कायम राहणार असल्याचे ब्रिगेटी यांनी म्हटले आहे. अमेरिका अशाप्रकारे आम्हाला धमकावू शकत नाही. रशियावर निर्बंध लादण्याचा निर्णय अमेरिकेचा असून यात आम्हाला खेचू नये असे दक्षिण आफ्रिकेचे मंत्री खुम्बुद्जो नत्शावेनी यांनी म्हटले आहे.
पुतीन यांनी साधला संपर्क
या पूर्ण प्रकरणादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर विचार व्यक्त केले आहेत. तत्पूर्वी संबंधित आरोपांवर अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया समोर आली होती. या आरोपांची सखोल चौकशी सध्यातरी केली जाणार नाही, परंतु हे एक गंभीर प्रकरण असल्याचे व्हाइट हाउसचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक प्रवक्ते जॉन किर्बी यांच्याकडून नमूद करण्यात आले होते.
तटस्थ भूमिका
15 महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान दक्षिण आफ्रिकेने संयुक्त राष्ट्रसंघात या मुद्द्यावर मतदान केलेले नाही. दक्षिण आफ्रिकेने अनेक महिन्यांपासून हे युद्ध तडजोडीद्वारे रोखण्याच्या बाजूने भूमिका मांडली आहे.









