नासाकडून केले जातेय परीक्षण
कॅलिफोर्नियातील जोबी एव्हिएशनने अमेरिकेच्या वायुदलाला पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रदान केली आहे. हे एक ईव्हीटीओएल म्हणजेच ऑल इलेक्ट्रिक टेकऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट आहे. प्रत्यक्षात ही एक उडणारी कार असून त्याचे परीक्षण दोन वर्षांपासून सुरू आहे. आता पहिल्यांदाच ही टॅक्सी अमेरिकेच्या वायुदलाने प्राप्त केली आहे.
वायुदलाने याला एएफडब्ल्यूईआरएक्स प्रोग्राम अंतर्गत मिळविले असून याच्या मदतीने शहरी तसेच हवाई वाहतुकीची स्थिती सुधारली जाऊ शकते का हे पाहिले जाणार आहे. या कार्यात वायुदलाला नासाचे सहकार्य मिळत आहे. नासाच्या अॅडव्हान्स्ड एअर मोबिलिटी मिशनचे इंटीग्रेशन मॅनेजर परिमल कोपर्डेकर यांनी ही भविष्य निश्चित करणारी मोहीम असल्याचे उद्गार काढले आहेत.
या टॅक्सीसाठी पुढील वर्षी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. याकरता विशेष वैमानिक निर्माण करावे लागतील, तसेच अॅडव्हान्स हार्डवेअर आणावे लागणार आहे. नासा या टॅक्सीचे परीक्षण करत आहे. ईव्हीटीओएल एअरक्राफ्टला एअरटॅक्सी म्हणून वापरले जाणार आहे. हे शहरांदरम्यान अन् शहरांमध्ये उ•ाण करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. यातून लोक अन् सामग्री दोन्ही गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचविल्या जाऊ शकतात.
फ्लाइंग टेस्टदरम्यान नासा या उडणाऱ्या कारची क्षमता पडताळून पाहणार आहे. याचा वापर कुठे होऊ शकतो हे देखील तपासले जात आहे. वैद्यकीय पुरवठा, जंगलातील वणवे विझविण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत याचा वापर होऊ शकतो. तसेच याच्या माध्यमातून मिळणाऱ्या डाटामुळे भविष्यातील नवी विमाने आणि एअर टॅक्सी मॉडेलिंग तसेच सिम्युलेशन तयार केले जाणार आहे.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या नियमांमध्ये कुठले आणि कशाप्रकारचे बदल करावे लागतील हे देखील यातून समजणार आहे. या राष्ट्रीय मोहिमेच्या अंतर्गत देशभरात भविष्यातील विमानो•ाण सेवांची उपयुक्तता पडताळली जात असल्याची माहिती कोपर्डेकर यांनी दिली आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास आगामी काही वर्षांमध्ये अशाप्रकारची सेवा पूर्ण अमेरिकेत दिसून येईल. याचा लाभ देश आणि विदेशातून आलेल्या लोकांनाही होणार आहे.
नासाच्या फ्लाइट टेस्टमध्ये ईव्हीटीओएल एअरक्राफ्ट यशस्वी ठरल्यास 2024 च्या अखेरपर्यंत याला देशात नागरी विमानो•ाण सेवांमध्ये सामील करण्याची अनुमती दिली जाऊ शकते. यामुळे अमेरिकेत एक नवी एव्हिएशन इंडस्ट्री उभी राहणार आहे. या परीक्षणादरम्यान एअरक्राफ्टचे तंत्रज्ञान, उ•ाणाची पद्धत, आवाज, प्रदूषणाची पातळी, संचार व्यवस्था, इमर्जन्सी प्रणालींसमवेत अनेक गोष्टींची तपासणी होणार आहे.
नासाचे पथक ईव्हीटीओएल एअरक्राफ्टच्या उ•ाण परीक्षणादरम्यान 50 हून अधिक मायक्रोफोन्सचा वापर करणार आहे. यातून ध्वनी प्रदूषण किती होते हे समजणार आहे. हे विमान नासाच्या परीक्षणात उत्तीर्ण होईल असा विश्वास असल्याचे जोबी एव्हिएशनचे संस्थापक अन् सीईओ जोबेन बीवर्ट यांनी म्हटले आहे. आम्ही या प्रकल्पावर 10 वर्षे काम केले आहे. तसेच याचे उ•ाणही केले आहे. ही अत्यंत यशस्वीपणे उडणारी कार ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









