जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना थक्क करून सोडतात. जगात एक अशीच गुहा आहे जी अत्यंत अनोखी आहे, कारण यात असलेले पाणी चमकणारे आहे. या गुहेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गुहा एखाद्या चमत्काराप्रमाणे दिसते. या व्हिडिओत ही गुहा दिसून असून तेथील पाणी चमकत असल्याचे दिसून येते. अॅक्वेरियममध्ये भरलेले पाणी चमकते, कारण त्याखाली लाइट लावण्यात आलेली असते. तशाचप्रकारे या गुहेतील पाणी चमकत असते, परंतु यामागील कारण काही वेगळेच आहे.
इटलीतील अनोखी गुहा इटलीच्या कॅपरी बेटात ही गुहा असून तिचे नाव ब्ल्यू ग्रोटो आहे. येथे चमकणारे पाणी काही जादू किंवा चमत्कार नाही. तर यामागे विज्ञानच आहे. प्रत्यक्षात गुहेत पाण्याखाली कॅव्हिटी म्हणजेच छिद्र आहे. गुहेच्या दुसऱ्या बाजून येणारा सूर्यप्रकाश या छिद्राद्वारे येतो आणि पाण्याच्या खालच्या हिस्स्यावर पडतो, यामुळे हे पाणी चमकत असल्याचे वाटू लागते. गुहेचे मुख केवळ 6.5 मीटर रुंद आहे. ही गुहा आता एक पर्यटनस्थळ ठरली आहे. येथे लोक पैसे देऊन नौकेतून प्रवास करतात. या व्हिडिओला आतापर्यंत 1.2 लाख ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कॉमेंट केली आहे.









