उत्रे / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे जवळील महाडीकवाडीयेथे एक दुर्देवी घटना घडली आहे. नदीवर बैलजोडी धुण्यास गेलेल्या शेतकऱ्याची बैलं उधळल्याने त्यांचा नदिच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेत शेतकऱ्याचे दिड लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी की, महाडिकवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव नरसू नाईक हे मोलमजुरी व बैलजोडी ने मशागत करून आपला उदरनिर्वाह करतात.मोठ्या मुश्किलीने परीस्थिती नसताना त्यांनी बैलजोडी खरेदी करून उदरनिर्वाह करीत होते. शेतात बैलजोडीसह आपला संसारगाडा चालवायचे.आजही ते दुसऱ्यांच्या शेतात भातरोपसाठी चिखल करुन बैल धुण्यासाठी कसबा ठाणे (ता.पन्हाळा) येथील कासारी नदीवर शारजाई खडक स्मशानशेडजवळ पुराच्या पाण्यात गेले होते.दुपारी दिडच्या सुमारास दोन्ही बैलांना त्यांनी धुतले.स्वता हातपाय धुत असताना बैल भुजल्याने गाडीसह पाण्यात गेले.पूराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बैला़ंचा मृत्यू झाला.आरडाओरडा झाल्यानंतर लोक जमले पण तोपर्यंत बैलांचा मृत्यू झाला होता.अजय अशोक फाटक यांनी दोन्ही बैलांना बाहेर काढले.या घटनेचा पंचनामा केला असून सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









