गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव (ता, करवीर ) येथील जाधव गल्लीमध्ये राहत असलेले आनंदा लक्ष्मण जाधव ( वय 60 ) शुक्रवारी सकाळी घरात चावीचे पाणी आल्याने घरावर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी भरली आहे का हे पाहण्यासाठी गेले. पाणी पहात आसताना त्या ठिकाणी ते पाय घसरून टाकीच्या बाजूलाच पडले डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर आनंद यांच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी त्यांना ताबडतोब सीपीआरला घेऊन गेले असता या ठिकाणी त्यांना मयत घोषित करण्यात आले.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना सुद्धा दिली आहे . जाधव गोकुळ शिरगाव येथील विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहत होते . जाधव हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्या अचानक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. जाधव यांच्या पक्षात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.









