वृत्तसंस्था/मायामी
सँटियागोला जाणाऱ्या बोईंग 787-9 ड्रीमलायनर विमानात मायामी ते चिली विमानप्रवासादरम्यान पायलटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या विमानात त्यावेळी 271 प्रवासी होते. लाटम एअरलाईन्सच्या 56 वषीय पायलट इव्हान अंदौर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. इव्हान यांना हार्ट अटॅक आल्यावर विमानातील इसाडोरा नावाच्या नर्सने, दोन डॉक्टरांसह अंदौर यांचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की वैद्यकीय तज्ञांच्या कठोर परिश्र्रमानंतरही त्यांना यश आले नाही. विमानाने उ•ाण घेताच पहिल्या 40 मिनिटातच इव्हान यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी विमानात कोणी डॉक्टर आहे काय? अशी विचारणा केली होती.









