लक्झरी पॅकेजमध्ये मिळतेय धोकादायक शस्त्रक्रियेची ऑफर
प्रेम आणि नात्यात व्हॅलिडेशन मिळविण्यासाठी लोक कधीकधी असे पाऊल उचलतात, ज्याबद्दल ऐकून अंगावर काटा येतो. तुर्कियेत सध्या असा ट्रेंड चर्चेत आहे, जो धक्कादायक अन् तितकाच धोकादायक आहे. याचे नाव लिंब-शॉर्टनिंग सर्जरी असून महिला उंची कमी करवून घेत आहेत.
जगातील बहुतांश हिस्स्यांमध्ये लोक उंच होण्यासाठी लाखो रुपये खर्च करत लेग-लेंथनिंग सर्जरी करवितात, परंतु तुर्कियेत अनेक महिला याच्या उलट स्वत:ची उंची कमी करविण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. याला हाइट पॉलिटिक्स म्हटले जात आहे. बहुतांश पुरुष कमी उंची असलेल्या महिलेला पसंत करतात, अशी तेथे धारणा आहे. अशास्थितीत उंच महिलांना असहज वाटू लागते, याच असहजतेला दूर करणे आणि डेटिंग गॅप समाप्त करण्यासाठी महिला या वेदनादायी शस्त्रक्रियेची मदत घेत आहेत.
कशी होते शस्त्रक्रिया?
लिंब-शॉर्टनिंग सर्जरीत डॉक्टर जांघेतील किंवा टिबियाचे हाड कापून त्याचा हिस्सा काढतात आणि मग उरलेल्या हाडाला स्टील रॉडने जोडतात. यापद्धतीने जांघेची लांबी सुमारे 5.5 सेंटीमीटर आणि टिबियाची लांबी सुमारे 3 सेंटीमीटरपर्यंत कमी होऊ शकते. एका महिलेने तर स्वत:ची उंची 172 सेंटीमीटरवरून घटवत 167.9 सेंटीमीटर करविली आहे.
ग्लॅमर विरुद्ध वस्तुस्थिती
इस्तंबुलमधील अनेक हायप्रोफाइल क्लीनिक याला लक्झरी पॅकेजप्रमाणे विकत आहेत. पॅकेजमध्ये शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, शहर हिंडणे, रेस्टॉरंटमध्ये डिनर आणि बोट राइड देखील सामील असते. ऐकण्यास हे ग्लॅमरस वाटते, परंतु प्रत्यक्षात हे अत्यंत वेदनादायी असते. रिकव्हरीत अनेक महिने लागतात, अनेक रुग्णांना दीर्घकाळापर्यंत व्हिलचेअरवर रहावे लागते. आठवड्यात 4-5 वेळा फिजियोथेरेपी करवून घ्यावी लागते आणि सर्वात मोठा धोका नसांना नुकसान, इंफेक्शन, हाडं न जुळणे आणि स्थायी कमजोरीचा आहे.
तज्ञांचे काय म्हणणे?
उंच महिलांमध्ये एंड्रोमेट्रियोसिस आणि कॅन्सरचा धोका अधिक असू शकते, असे काही संशोधनांमध्ये सांगण्यात आले. परंतु याचे उंची कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी काहीच देणेघेणे नाही, हे पूर्णपणे सामाजिक दबाव आणि आत्मस्वीकृतीच्या कमतरतेचा परिणाम असल्याचे डॉक्टर स्पष्ट सांगतात. हे कॉस्मेटिक कारणांमुळे करविण्यात येणारी अत्यंत जोखिमयुक्त प्रक्रिया असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे सांगणे आहे. हा ट्रेंड समाजात सुंदरता आणि पुरुष-महिलेशी निगडित जुन्या मापदंडांमुळे वाढत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे सांगणे आहे.









