पणजी : येथील बसस्थानक परिसरात आंबेडकर उद्यानाच्या समोरील भागात भर रस्त्यावरच रोज एक बस बिनदिक्कत उभी ठेवण्यात येत आहे. सकाळी 8.30 ते 9.30 च्या सुमारास हा प्रकार घडत असून शहरात मोठ्या संख्येने प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. तरीही कोणतीही यंत्रणा त्याच्यावर कारवाई करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा विचित्र प्रकार अनुभवास येत आहे. तेथील साईबाबा मंदिर आणि रेगो हॉटेल यांच्या मधील भागात ही बस कितीतरी वेळ उभी ठेवण्यात येत आहे. आर्श्चकारक प्रकार म्हणजे अनेकदा तिचा चालकही आत नसतो. सदरची जागा स्वत:च्या मालकीची असल्याच्या तोऱ्यात तेथे बस ठेऊन तो खाली उतरतो. सदर बस प्रवाशी वाहतुकीतील नसल्यामुळे एखाद्या कंपनीच्या कामगारांना नेण्यासाठी आलेली असावी असे वाटते. खरे तर सदर बस कोकणी अकादमीच्या समोरील भागात किंवा एखाद्या कमी वर्दळीच्या ठिकाणी ठेवता येऊ शकते, परंतु चालकाची वागणूक पाहता एक तर तो वाहतूक खाते आणि पोलिसांना आव्हान देत असावा किंवा इतरांना त्रास देण्यात त्याला धन्यता वाटत असावी असे दिसून येत. अडचणीच्या जागी ठेवण्यात येणाऱ्या या बसमुळे पाटो भागातून मुख्य रस्त्यावर प्रवेश करणाऱ्या वाहनांना उजव्या बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. अशावेळी एखाद्या चालकाने बेसावधपणे वाहन रस्त्यावर घेतल्यास मोठा अपघात घडू शकतो. त्यात एखाद्या निश्पाप व्यक्तीला विनाकारण त्रास सहन करावे लागू शकतात. एरव्ही एखाद्या चालकाने मिनीटभरासाठी सुद्धा अशाप्रकारे वाहन उभे ठेवल्यास वाहतूक पोलीस लगेच चाकाना लॉक मारतात किंवा भरभक्कम रकमेचे चलन देतात. अशावेळी सदर बसचालकावर मात्र कोणतीही यंत्रणा कारवाई करत नाही यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Previous Articleबार्देशात झाडांची पडझड
Next Article तिन्ही ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक शांततेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









