देशातील एकूण 19 विरोधी पक्षांसह (Opposition Party) महाराष्ट्रातील (Maharashtra) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) या दोन प्रमुख पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्धाटन (parliament Inaughration) कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या इमारतीचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते न होता राष्ट्रपतींच्या हस्ते उद्धाटन व्हावे अशी भुमिका विरोधकांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या पुढाकाराने टाकलेल्या या बहिष्कारामध्ये बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, जनता दल (युनायटेड) द्रविड मुनेत्र कळघम हे पक्षसुद्धा सामिल झाले आहेत. या पुर्वीच तृणमूल काँग्रेस (TMC), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), आम आदमी पार्टी (AAP) आणि CPI (मार्क्सवादी) यांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे.
उद्घाटन कार्यक्रमावर 19 समविचारी विरोधी पक्षांनी केंद्राच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या कार्यक्रमाला न बोलवता त्यांना पुर्ण बाजूला सारून’ नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होण्याला आपला पुर्ण विरोध असल्याचे निवेदन विरोधी पक्षांनी प्रसिध्द केले आहे. तसेच हा निर्णय म्हणजे केवळ घोर अपमानच नाही तर आपल्या लोकशाहीवर थेट हल्ला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
संसदेचे काम हे राष्ट्रपतीविना होउ शकत नाही कारण घटनेनुसार कायदे मंडळाचे प्रमुख हे राष्टपती हेच असून राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या सर्वांनी मिळून संसद तयार होते. असा दावा विरोधकांनी करून त्यामुळे या कार्य़क्रमाला त्यांना आमंत्रित न करणे हा त्या पदाचा अपमान आहे. अशी भावना विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या संसदेच्या उद्धाटन समारंभाचा वाद पंतप्रधानांनी करावा की राष्ट्रपतींनी करावा हा शिगेला पोहोचला आहे.
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी “आम्ही संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींना इमारतीचे उद्घाटन करण्यास न सांगणे हा त्यांचा अपमान आहे.” असे पत्रकारांना सांगितले.