खानपूर प्रतिनिधी – खानापूर तालुक्यातील खेमेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक अजय काळे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी खेमेवाडी शाळा सुधारणा समिती पालक तसेच पंच कमिटी यांच्यावतीने तालुका शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून बदलीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सीडीएमसीने अजय काळे यांच्या वर्तणुकीबद्दल अनेक तक्रारी राजेश्वरी कुडची यांच्याकडे कथन केल्या, तसेच गेल्या दोन वर्षापासून अजय काळे हे विद्यार्थ्यांना सातत्याने मारहान करत आहेत, दहशत घालत आहेत. तसेच शाळेतील वर्तणूक शिक्षकाला शोभेल असे नाही. यासाठी या शिक्षकाची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सुट्टी संपल्यानंतर शाळेला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष हुवाप्पा येळ्ळुरकर, परसराम चोपडे, पल्लवी चोपडे, मल्हारी खाबले, बाळू चोपडे, मल्हारी गणेबैलकर, विष्णू कांबळे, लक्ष्मी सावंत, माधुरी थांबले, पूजा चोपडे, नीलम खांबले, लीला गनैबलकर यासह मोठ्या संख्येने पालक. ग्रामस्थ पंचमंडळी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी कुडची यांनी निवेदनचा स्वीकार करून आपण याबाबत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









