आयटी क्षेत्र आगामी काळात मजबूत स्थिती प्राप्त करणार
नवी दिल्ली :
भारताचा तंत्रज्ञान उद्योग हा सध्याच्या अनिश्चित वातावरणातही मजबूत राहिलेला आहे. तसेच तो आर्थिक वर्ष 2023 मध्ये आणखी गती प्राप्त करत 245 अब्ज डॉलरच्या उलाढालीच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती आहे. निर्णय प्रक्रियेतील विलंब, मागणीतील दबाव यांचा या उद्योगावर परिणाम राहणार असल्याचे संकेतही आहेत. यामध्ये आर्थिक वर्ष 2022 च्या आकड्यांसोबत तुलना केल्यास आर्थिक वर्ष 2023 च्या आकडेवारीवर परिणाम झाला आहे.
धोरणात्मक आढाव्यानुसार…
आयटी सेवा, बीपीएम, सॉफ्टवेअर उत्पादने, एफआय अॅण्ड डी व देशांतर्गत बाजारातील विविध विभागांची उलाढाल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 194 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज आहे, आर्थिक वर्ष 22 च्या तुलनेत यात 9.4 टक्के इतकी वाढ राहणार असल्याचे भाकीतही मांडले आहे.
अ]िनश्चितता कायम रामानुजम, नॅसकॉमचे अध्यक्ष
नॅसकॉमचे अध्यक्ष कृष्णन रामानुजम म्हणाले की, सध्याला अनिश्चितता कायम आहे. आयटी उद्योगात सध्याला 54 लाख कर्मचारी कार्यरत असून 2 लाख 90 हजारपेक्षा अधिक नव्या रोजगाराच्या संधीही या उद्योगाने आर्थिक वर्ष 2023 उपलब्ध केल्या आहेत. जवळपास 36 टक्के इतका कर्मचारी वर्ग हा कौशल्ययुक्त असून कृत्रिम बुद्धिमतेच्याबाबतीत व डाटा अॅनालिसीस विभागातही कुशल कर्मचारी सेवा बजावत आहेत. या एकंदर कर्मचाऱ्यांमध्ये 20 लाख महिला असून वर्षात जवळपास 1 लाख 40 हजार महिलांना या उद्योगात सामील कऊन घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आर्थिक वर्ष 2024 जागतिक स्तरावर संकटाचे असले तरी भारतीय आयटी उद्योग मात्र आशावादी असून आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करून कार्यरत आहे.









