कारण जाणून घेतल्यावर व्हाल अचंबित
लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करू शकतात. कुणी स्वत:च्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया करून घेतात, तर कुणी विविध कसरती करत स्वत:चा लुक बदलण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण स्वत:साठी योग्य नसलेल्या गोष्टीही करू लागतात. सध्या काही लोक एका धोकादायक ट्रेंडला फॉलो करत आहेत.
हा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात लोक स्वत:च्या हातात हातोडा घेऊन स्वत:च्या चेहऱ्यावरील हाडं मोडत आहेत. या अजब प्रयोगामुळे जॉलाइन चांगली होईल असे लोकांना वाटत आहे. परंतु हे अत्यंत वेदनादायी असल्याने ते प्रत्येकाला शक्य नाही.
टिकटॉकवर एक चॅलेंज सुरू असून त्यात चांगली जॉलाइन प्राप्त करण्यासाठी लोकांना विचित्र प्रकार करण्यास सांगण्यात येत आहे. याच्या अंतर्गत हातोडा किंवा त्याच्यासारख्या मजबूत गोष्टीद्वारे गाल किंवा जबड्याच्या हाडांवर वारंवार वार केले जातात. यामुळे चेहऱ्यावर छोटेछोटे प्रॅक्चर होतात आणि हाडांची रचना आकर्षक आकार प्राप्त करत असल्याचे हा प्रयोग करणारे लोक सांगत आहेत.

हॅशटॅगबोन्समॅशिंग या नावाने हा ट्रेंड लोकप्रिय होत असून आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या चॅलेंजला अनेक जण योग्य ठरवत असून चांगल्या जॉलाइनसाठी यावर अंमलबजावणी करत असल्याचे सांगत आहेत. स्वत:च्या चेहऱ्याची हाडं जाणूनबजून मोडू नका, मोडलेली हाडं आपोआप बरी होतील परंतु हे योग्यप्रकारे न होण्याचा किंवा त्याचा आकार बिघडण्याचा धोका आहे. एक्सरसाइज करूनही स्वत:ची जॉलाइन सुधारता येते असे सॅन फ्रान्सिस्कोतील प्लास्टिक सर्जन प्रेम त्रिपाठी यांनी म्हटले आहे.









