अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे कौतुकोद्गार
व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने लखमापूर येथे 5 हजार रोपांची लागवड
कोल्हापूर प्रतिनिधी
जेव्हा एखादी संकल्पना समाज उचलून धरतो, त्यावेळी त्याला चळवळीचे स्वरुप येते. व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी यापूर्वी करवीर महोत्सवाच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात एक वेगळा उपक्रम राबविला होता. आता लखमापूर परिसरात 5 हजार रोपांची लागवड करून निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांची वृक्षारोपण चळवळ कौतुकास्पद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्पष्ट केले.
व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी ‘चला करू झाडांशी मैत्री !’ या टॅगलाईनखाली गगनबावडा तालुक्यातील लखमापूर येथे बांबू, जांभूळ, करंजी अशा तब्बल 5 हजार रोपांची लागवड करण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार 20 ऑगस्ट रोजा सकाळी 1 हजारांहून अधिक नागरिकांनी लखमापूर येथे वृक्षारोपण केले. यावेळी देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बारा किलोमीटरच्या जंगलामध्ये पायी ट्रेक करून युवक व युवतींनी 5 हजार रोपे लावण्याचा उच्चांक केला. वनभोजन आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य यामुळे हा निसर्ग सोहळा अविस्मरणीय ठरला. व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या हस्ते सर्व वृक्षप्रेमींना प्रशंसापत्र देण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक गुरुप्रसाद, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिलाष साटपे, प्रबंधक, रिझर्व बँक ऑफ इंडिया,च्या प्रबंधक डॉ.संगीता निंबाळकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, दोनवडेचे सरपंच बबन शिंदे, संग्राम भापकर,तानाजी पालकर, स्वप्नील शिंदे, आनंदा पाटील, एकनाथ पाटील, प्रा.कैलास पाटील, अँड.केसरकर, लखन पाटील, अजय चौगले, शब्बीर हसन नाचरे, पोलीस पाटील असगर अली मोहम्मद रेठरेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. वनभोजन आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य यामुळे हा निसर्ग सोहळा अविस्मरणीय ठरला.