सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur News : रस्त्यावरती खड्डा हे कोल्हापुरात नवीन नाही. खड्डा महिनोनमहिने मुजवला जात नाही यातही काही विशेष नाही.खड्ड्याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी खड्ड्यात चुन्याने रंगवलेला दगड किंवा झाडाच्या फांद्या उभ्या केल्या जातात यातही काही विशेष नाही. पण येथे खड्डा आहे याची जाणीव करून देण्यासाठी खड्ड्यात रोवलेल्या झाडाच्या फांद्यानी त्याच खड्ड्यात आता चांगले मूळ धरले आहे. झाड हिरवेगार होऊन बहरले आहे. त्यातले झाड बहरले हे चांगले झाले आहे पण झाड बहरले तरी रस्त्यावर मधोमध असलेला खड्डा मात्र दीड वर्ष झाली जसाच्या तसा आहे. महापालिका रस्त्यावरच्या खड्ड्याबाबत किती संवेदनशीलठ आहे याची हे झाड म्हणजे एक प्रतीक ठरले आहे.
दुधाळी मैदानाकडून रंकाळा टॉवरकडे जाणाऱ्या हरी मंदिरासमोरच्या चौकातमध्येच चॅनेल जवळ हा खड्डा गेली वर्षभर आहे. खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून एक बरॅकेटिंग लावले आहे.आणि खड्डा लोकांच्या सहजपणे लक्षात यावा म्हणून तरुणांच्याकडून त्यात झाडाच्या फांद्या लावल्या गेल्या होत्या. वास्तविक शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठेतून रंकाळा टॉवर कडे जाणाऱ्या या शॉर्टकट रस्त्यावर खूप वर्दळ असते.दोन्ही बाजूला घरे आहेत.त्यामुळे चॅनेल दुरुस्त करणे किंवा मध्येच असलेला खड्डा मुजवणे हे तातडीने करायला हवे होते.पण गेल्या दीड वर्षात तसे काही झाले नाही.अपघात होऊ नये म्हणून चेरीच्या झाडाच्या फांद्या खड्ड्यात टाकल्या गेल्या.
गेले वर्षभर याच खड्ड्यात असलेल्या या चेरीच्या झाडांनी निसर्गचक्रानुसार या खड्ड्यातच हळूहळू मूळ धरले.आता हे मूळ चांगलेच घट्ट झाले आहे.झाडाला नव्या फांद्या फुटल्या आहेत.झाडाची उंची वाढली आहे.बॅरीकेट झाकली गेली आहे.खड्डा मात्र या झाडाच्या खाली जसाच्या तसा आहे.आता या चेरीच्या झाडाला पांढरी फुले फुटली आहेत.आणि काही दिवसांनी या झाडाला चेरीची फळे येतील अशी स्थिती आहे.पण खड्डा मुजवण्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही अशी स्थिती आहे.
शहराच्या विस्ताराच्या तुलनेत किंवा विकास प्रक्रियेत रंकाळा टॉवर रस्त्यावरचा खड्डा व त्या खड्ड्यात बहरलेले झाड हा तसा खूप छोटा मुद्दा आहे.पण रस्त्यावरच्या खड्ड्याबाबत महापालिकेला किती अनास्था आहे याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष वेध णारा आहे.रस्त्यावरच्या एखाद्या खड्ड्यात झाड मूळ धरते,बहरते,फुल फुलण्याच्या अवस्थेला येते तरी खड्ड्याकडे कोणाचे लक्ष न जाणे याबद्दल लोकात संताप आहे.आणि आता या झाडाला चेरीची फळे येण्यापूर्वी तरी खड्डा मुजवावा अशी लोकातून उपहासात्मक मागणी आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









