एअरबीएनबीत केले रुपांतरित : सुंदर दृश्यांदरम्यान एअरप्लेन हाउस करणार थक्क
एक पूर्व वैमानिक जॉन कोटविकी यांनी सेवतून हटविण्यात आलेले 1956 डग्लस डीसी-6 कार्गो विमानाला एका खास आणि आरामदायी एअरबीएनबी रेंटलमध्ये बदलून टाकले आहे. बिग लेक, अलास्का येथे या जुन्या विमानात आता दोन बेडरुमचा लेआउट, एक किचन, एक लिव्हिंग रुम आणि कॉकपिट देखील आहे. हिमाच्छादित भागात असलेले हे रेंटल विमान पाहण्यास अत्यंत आकर्षक वाटते. सोशल मीडियावर याचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मूळ स्वरुपात 1956 मध्ये उडविण्यात आलेले हे विमान सुमारे 41 हजार रुपये प्रति दिवसाच्या भाडेतत्वावर उपलब्ध आहे. जॉन कोटविकी यांच्या एअरबीएनबी प्रोफाइलनुसार त्यांनी विमानाला सावधपणे 1700 फूट लांब खासगी धावपट्टीच्या कडेला ठेवले आणि अतिथींची वाहने, ट्रक आणि बुश विमानांसाठी पुरेशी जागा सुनिश्चित केली आहे. परंतु विमानाच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा अचूक खर्च सांगण्यात आलेला नाही. पण विमानाची किंमत 10 हजार डॉलर्सपासून 2 लाख 50 हजार डॉलर्सपर्यंत असू शकते असे बिझनेस इनसाइडरच्या अहवालात म्हटले गेले आहे. हे विमान खरेदी अन् परिवहनासाठी सुमारे 1 लाख डॉलर्स खर्च केल्याचा खुलासा कोटविकी यांनी केला आहे.
हिमाच्छादित भागात एअर बीएनबी
हवाई शॉट्समध्ये सेवेतून निवृत्त विमान हिमाच्छादित भागात दिसून येते. याची मेटल बॉडी हिमाच्छादित भागात चमकताना दिसून येते. बर्फाने विमान आणि आसपासच्या वृक्षांना आच्छादिले आहे. स्वत:च्या समृद्ध इतिहासासोबत ही संपत्ती स्वत:च्या अनोख्या वैशिष्ट्यांसाठीही ओळखली जाते. खास बाब म्हणजे विंग डेकरवर एक फायर पिट असून तो अतिथींना थंड वाऱ्यांदम्यान उबदार राहत अलास्काच्या मोहक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी एक आरामदायी जागा पुरविते. या एअरबीएनबीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंटरनेट जगताने या विमान एअरबीएनबीला अत्यंत पसंत केले आहे. हे तर खरोखरच उत्तम असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने हे कल्पनेपलिकडील असल्याची टिप्पणी केली आहे.









