अनिल कपूर अन् आदित्य मुख्य भूमिकेत
अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘द नाइट मॅनेजर’ या हिंदी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याच नावाच्या ब्रिटिश स्पाय सीरिजचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या हिंदी सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला देखील दिसून येणार आहे.

‘द नाइट मॅनेजर’मधून अनिल कपूर तसेच आदित्य हा ओटीटीच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरला मोठी पसंती मिळाली आहे. या सीरिजमध्ये अनिल कपूर हे आर्म्स डीलर शैली रुंगटा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ब्रिटिश स्पाय सीरिजमध्ये लॉरी यांनी अशाप्रकारची भूमिका साकारली होती. तर आदित्य कपूर हा द नाइट मॅनेजर सीरिजमध्ये जोनाथन पाईच्या भूमिकेत असणार आहे.
द नाइट मॅनेजर या वेबसीरिजमध्ये तिलोत्तमा शोम देखील मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमधील कलाकारांची फौज मोठी असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्रिटिश स्पाय सीरिजला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. याचमुळे हिंदी रिमेकला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. द नाइट मॅनेजर ही सीरिज 17 फेब्रुवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाणार आहे.









