दहशतवादात सामील तरुणींची कहाणी
‘द केरल स्टोरी’चा ट्रेलर जारी झाला आहे. या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर घडवून आणत दहशतवादाच्या आगीत लोटण्यात आलेल्या युवतींची कहाणी दर्शविण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये केरळमधील शालिनी उन्नीकृष्णनचा फातिमा होण्याचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. या चित्रपटात इस्लामिक स्टेटच्या कार्यपद्धतीलाही दर्शविण्यात आले आहे.

केरळ राज्यातील अनेक युवतींची या चित्रपटात कहाणी दर्शविण्यात आल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. युवतींचे ब्रेनवॉश करत कशाप्रकारे त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये सामील करण्यात आले यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये 2006 पासून 2011 पर्यंत केरळचे मुख्यमंत्री राहिलेले व्ही.एस. अच्युतानंदन यांच्या एका कथित वक्तव्याचा दाखला देण्यात आला आहे. पुढील 20 वर्षांमध्ये केरळ इस्लामिक स्टेट होणार असल्याचे अच्युतानंदन यांनी म्हटले होते असा दावा आहे.
इस्लामिक स्टेटमध्ये केरळमधील अनेक जण सामील झाले होते. यात हिंदू अन् ख्रिश्चन धर्मीय मुलींचे धर्मांतर घडवून आणत त्यांना दहशतवादी संघटनेत सामील करण्यात आल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले होते. याच घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचे समजते.









