हॉरर-थ्रिलरपट 2 जूनला झळकणार
ट्वेटिएथ सेंच्युरी स्टुडिओज आणि 21 लॅप्सचा हॉरर-थ्रिलर चित्रपट द ‘बूगीमॅन’चा नवा ट्रेलर आणि पोस्टर सादर करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत भीतीदायक अन् अन् अंगावर काटा आणणारा आहे. हा चित्रपट 2 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट स्टीफन किंग यांच्या लघुकथेवर आधारित आहे. ही लघुकथा 1973 मध्ये प्रकाशित झाली होती.
‘द बूगीमॅन’ या चित्रपटात सोफी थॅचर, क्रिस मेसिना, विवियन, लायरा ब्लेयर, मारियन आयरलँड, मॅडिसन हू, लिसागे हॅमिल्टन आणि डेव्हिड डेस्टमलचियन हे कलाकार दिसून येतील. किंग यांच्या लघुकथेचे वाचन केल्यावर मनात निर्माण झालेली भीती अद्याप आठवते. या भीतीचा जगभरातील प्रेक्षकांनाही अनुभव घेता यावा असा माझा प्रयत्न असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शन रॉब सॅवेज यांनी म्हटले आहे. या चित्रपटात कलाकारांचा अद्भूत अभिनय पहायला मिळणार आहे.
चित्रपटाची कहाणी एका मनोचिकित्सकाची असून जो एका रुग्णाला भेटल्यावर अलौकिक शक्तींचा अनुभव घेऊ लागतो. रुग्णासोबत घडणारे प्रकार डॉक्टरासोबत कशाप्रकारे घडू लागतात हे या चित्रपटात दर्शविण्यात आले आहेत.









