कार्तिक अन् क्रीति सेनॉन मुख्य भूमिकेत
कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘शहजादा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट अल्लु अर्जुनचा सुपरहिट चित्रपट अला वैकुंठपुरमूलूचा हिंदी रिमेक आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात ‘लार्जर दॅन लाइफ’ सारखी ऍक्शनदृश्ये करताना दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये ऍक्शनसोबत कॉमेडीची झलक दिसून येत आहे.

कार्तिक आर्यन या चित्रपटात अनेक छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. कार्तिक यात स्वतःचे कुटुंब आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी कुठलेही टोक गाठणाऱया युवकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात क्रीति सेनॉन, परेश रावल आणि मनीषा कोइराला देखील दिसून येणार आहे. ‘शहजादा’मध्ये परेश रावल हे कार्तिकच्या व्यक्तिरेच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. तर मनीषा कोईराला आईच्या भूमिकेत आहे. तर क्रीति सेनॉन नेहमीप्रमाणे एका ग्लॅमरल रोलमध्ये आहे. ‘शहजादा’ चित्रपटात राजपाल यादव देखील आहेत. अल्लु अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमूलू’ चित्रपटाने मोठे यश मिळविले होते. याचमुळे कार्तिकच्या या चित्रपटाकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.









