आलिया अन् रणवीर सिंह मुख्य भूमिकेत
आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. रॉकी आणि रानी या व्यक्तिरेखांमधील केमिस्ट्रीच या ट्रेलरचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. ट्रेलरमध्ये रणवीरचा उत्साह अन् आलियाचे सौंदर्य दिसून येत आहे.

चित्रपटात रणवीर हा रॉकी रंधावा तर आलिया ही रानी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. रॉकी हा पंजाबी पार्श्वभूमीचा तर रानी ही उच्चशिक्षित अन् बंगाली पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाची सदस्य असल्याचे दिसून येते. या दोघांमधील प्रेमकथेला त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधावर या चित्रपटाची कहाणी आधारित असल्याचे समजते.
या चित्रपटात आलिया, रणवीर यांच्यासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे करण जौहरने 6 वर्षांनी दिग्दर्शकीय पुनरागमन केले आहे.









