तू झूठी मैं मक्कार चित्रपट
रणवीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्वतःचा आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’वरून चर्चेत आले आहेत. चित्रपट स्वतःच्या शीर्षकामुळेच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांच्या उत्सुकतेदरम्यान आता सोमवारी चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’च्या ट्रेलरपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा टायटल प्रोमो जारी केला होता, त्याला मोठी पसंती मिळाली होती. प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते सोशल मीडियावर ‘तू झूठी मैं मक्कार’ची मोठी हवा निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेमकथा रंगविण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजनने केले आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी टी-सीरिज आणि लव फिल्म्सकडून करण्यात आली आहे. चित्रपट होळीवेळी प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
या चित्रपटात रणवीर आणि श्रद्धा यांच्यासह डिंपल कपाडिया, बोनी कपूर अणि आयशा रजा मिश्रा देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. याचबरोबर स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी देखील या चित्रपटात काम करत आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’ हा रणवीर पूरचा अखेरचा रॉमकॉम (रोमँटिक) चित्रपट आहे. अभिनेता नेहमीच चॉकलेट हीरोच्या व्यक्तिरेखांसाठी ओळखला जात राहिला आहे, परंतु रणवीरने अलिकडेच हा आपला अखेरचा रॉमकॉम चित्रपट असल्याची घोषणा केली आहे. रणवीर सध्या संदीप वांगा रेड्डीच्या ‘ऍनिमल’ चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.









