जावेद जाफरी, सोनाली कुलकर्णी आणि श्वेताबसू प्रसाद यांची नवी वेबसीरिज ‘ऊप्स अब क्या?’चा ट्रेल प्रदर्शित करण्यात आला आहे. या कमालीच्या कॉमेडीत अनेक असे ट्विस्ट पहायला मिळतील जे रोमांच निर्माण करणार आहेत. परंतु सर्वात मोठा ट्विस्ट चुकून आर्टिफिशियल इनसेमिनेशनद्वारे रुहीच्या जीवनात उलथापालथ घडल्यावर दिसून येणार आहे. रुही डॉक्टरच्या चुकीमुळे गरोदर राहते. दोन रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टर चुकून अन्य कुणाचा स्पर्म कुणाच्या ओवरीसोबत फर्टिलाइज करतो. सत्य समोर येताच खळबळ उडते असे ट्रेलरमध्ये दिसून येत.
ऊप्स अब क्या या सीरिजमध्ये अपरा मेहता, अभय महाजन आणि इमी एला हे कलाकार देखली आहेत. प्रेम मिस्त्राr आणि देवात्मा मंडल यांनी याचे दिग्दर्श पेले आहे. तर ही सीरिज 20 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पटकथा वाचताच हा एक अजब प्रवास असेल हे कळून चुकले होते. माझ्या व्यक्तिरेखेचे जीवन काही सेकंदात बदलून जाते आणि हे सर्व अत्यंत विनोदी शैली अन् भावनायुक्तपणे दर्शविण्यात आले आहे असे श्वेताने सांगितले आहे. या सीरिजमधील ह्यूमर अत्यंत शार्प असून भावना वास्तववादी आहेत. तर सर्व व्यक्तिरेखा अत्यंत जोडल्या गेलेल्या आहेत असा दावा जावेद जाफरी यांनी केला आहे.









