युनिव्हर्सल पिक्चर्सने स्वत:चा आगामी चित्रपट ‘फाइव्ह नाइट्स अॅट फ्रेडीज’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर जारी केला आहे. युनिव्हर्सल पिक्चर्सने ‘एम3जीएएन’, ‘द ब्लॅक फोन’ आणि ‘द इनव्हिजिबल मॅन’ यासारखे गाजलेले चित्रपट निर्माण पेले आहेत. युनिव्हर्सल पिक्चर्स पुन्हा एकदा फाइव्ह नाइट्स अॅट फ्रेडीजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट याच नावाने लोकप्रिय हॉरर व्हिडिओ गेमवर आधारित आहे. चित्रपट 27 ऑक्टोर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट एका त्रस्त सुरक्षारक्षकासोबत घडणाऱ्या घडामोडींवर आधारित असून तो फ्रेडी फॅजबियरच्या पिझ्झा सेंटरमध्ये काम करत असतो.
नोकरीतील पहिली रात्र घालविताना त्याला तेथील रहस्यमय गोष्टी उलगडा होतो, त्याच्यासोबत विचित्र घटना घडतात असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.हा चित्रपट जेसन ब्लम, स्कॉट कॉथॉन याच्याकडून निर्मिण्यात आला आहे. तर एम्मा टॅमी यांनी याचे दिग्दर्शन पेले आहे. या चित्रपटात जोश हचर्सन, एलिझाबेथ लेल, कॅट कोनर स्टर्लिंग आणि पाइपर रुबियो यांच्यासोबत मॅरी स्टुअर्ट मास्टर्सन तसेच मॅथ्यू लिलार्ड हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत.









