चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरून यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अवतार फायर अँड ऐश’मध्ये पँडोराची पुढील कहाणी पाहण्याची संधी प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. ‘अवतार 3’ चित्रपटातील खलनायक ‘वारांग’ची पहिली झलक तसेच ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बजेट 25 कोटी डॉलर्स म्हणजेच 2100 कोटीहून अधिक आहे. अवतार फँचाइजीचा नवा चॅप्टर चालू वर्षी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची पहिली झलक शेअर केली आहे. पहिल्या पोस्टरमध्ये खलनायक वारांगचा चेहरा आहे. ही भूमिका ऊना चॅपलिन साकारत आहे. वारांगला मंगक्वान समुदाय किंवा ऐश पीपलचा नेता संबोधिले जात आहे. ट्रेलर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. यात खलनायक वारांगला लाल आणि काळ्या रंगाच्या हेडड्रेसमध्ये दाखविण्यात आले आहे. तो जेक आणि नेयतिरीची मुलगी किरीला ओलीस ठेवतो आणि तुमच्या देवीचे येथे प्रभुत्व नसल्याचे म्हणत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.








