वार्ताहर /नंदगड
नंदगडमध्ये गेली 79 वर्ष ‘एक गाव एक गणपती’ परंपरा चालत आली आहे. गेली दोनवर्षे कोरोनामुळे बसवेश्वर मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण यावषी मंडळ पूर्वीप्रमाणेच मोठय़ा उत्साहात बाजारपेठेमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहे. यावषी मंडळाने युवकांवर उत्सवाची जबाबदारी सोपवलेली आहे. रोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रतिदिनी पूजेच्यावेळी भाविक मोठय़ा संख्येने आरतीला उपस्थित राहत आहेत.
गुरुवारी गणहोम-महाप्रसाद
गुरुवार दि. 8 रोजी मंडळातर्फे गणहोम आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री 9 वाजता भव्य खुल्या एकेरी आणि दुहेरी डान्स स्पर्धांचे आयोजन केले आहे. विजेत्यांना अनुक्रमे 5001, 3001. 2001, 551 रु. अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.









