ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आंध्रप्रदेशातील तिरुपतीजवळ भरधाव मर्सिडीजने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत मजबूत समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले. या अपघातानंतर मर्सिडीजच्या सुरक्षाविषयक फिचर्सबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण झाले आहे. The tractor was in two pieces in the collision with the speeding Mercedes
सोमवारी आंध्रप्रदेशातील तिरुपतीजवळ चंद्रगिरी बायपास रस्त्यावर भरधाव वेगातील मर्सिडीजने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. हा अपघात पाहून पाहणाऱ्यांना धक्काच बसला. मर्सिडीच्या धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तर ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली. मर्सिडीजच्या सुरक्षाविषयक फिचर्समुळे कारचे फारसे नुकसान झाले नाही. कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, ट्रॅक्टर ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. ट्रॅक्टर रस्त्यात आडवा आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
अधिक वाचा : नगरमध्ये PFI च्या दोन कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई









