अंधेरी : फक्त औपचारिकता राहीलेल्या अंधेरी पोटनिवडणुकित ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. मतमोजणीच्या 19 व्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 61056 मते मिळाली. या निवडणुकित नोटाला मिळलेली मते हा चर्चेचा विषय ठरला असून दुसऱ्या क्रमांकाची एकुण 12160 मते नोटाला मिळाली आहेत. आज सकाळी 8 वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली.
राज्यासह संपुर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अंधेरी पोटनिवडणुकि सगळ्यांचे लक्षल लागले होते. शिवसेना फुटीनंतर ही पहीलीच पोटनिवडणुक असल्याने याला महत्व आले होते. शेवटपर्यंत भाजप आणि ठाकरे गटाशी लढत होईल असे वाटत असताना भाजपने ऐनवेळी माघार घेतली. यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सुखकर झाला. सुरवातीपासूनच ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली होती. ती 19 व्या फेरीच्या अखेरीपर्यंत रहिली. श्रीमती लटके यांना 19 व्या फेरीत एकुण 61056 मते मिळाली.
निकालानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. या आनंदोत्सवात महिला आघाडीवर होत्या. माध्यमांशी बोलताना ऋतुजा लटके यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचे आभार मानले. श्रीमती लटके यांचे वेगवेगळ्या राजकिय पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदन केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








