रुमडामळ-दवर्ली खुनाचे रहस्य उलघडेना : पर्वरीत प्रियकराने काढला प्रेयसीचा काटा,राज्यात चार दिवसांत सहाजणांचे खून
मडगाव, पर्वरी : गेल्या चार दिवसांत गोव्यात खुनांचे सत्र चालूच असून केवळ चार दिवसांत तब्बल सहा जणांचे खून करण्यात आले. करमळी, डिचोली, फातोर्डा, येथील खुनानंतर काल शुक्रवारी पर्वरी व रुमडामळ-दवर्ली येथे दोघांचे खून करण्यात आले. सासष्टीतील रुमडामळ येथे सय्यद नावाच्या व्यक्तीचा त्याच्या घरात खून करण्यात आला असून पर्वरी येथील घटनेत प्र्रियकराने प्रेयसीचा खून करुन तिचा मृतदेह आंबोली येथे टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या खुनांच्या थराराने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली आहे. रुमडामळ येथील खुनाची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सायंकाळी उशिरा संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस बेळगाव येथे गेले आहेत.
सय्यदने तलवारीने कापला होता केक
प्राप्त माहितीनुसार मयत सय्यद हा एका गंभीर प्रकरणात गुंतलेला होता. त्यातून हल्लीच तो जामिनावर सुटलेला होता. त्यानंतर त्याने आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. वाढदिवसाचा केक सर्वसाधारण लोक सुरीने कापतात, मात्र सय्यदने आपला केक तलवारीने कापला होता, अशी माहिती आहे. या वाढदिवसाचे छायाचित्र एकाने प्रतिस्पर्धी गटातील काहींना पाठविल्याचीही चर्चा आहे. यातूनच पुन्हा एकदा हा गंभीर प्रकार घडलेला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस बेळगावला रवाना झाले आहेत.
पर्वरी येथे प्रेयसीचा खून
प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्यामुळे रागाच्या भरात सुकुर येथे राहणाऱ्या प्रेयसीचा खून करून मृतदेह आंबोली घाटामध्ये टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश चुंचवाड (22, पर्वरी, मूळ कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव असून पर्वरी पोलिसानी त्याला आणि त्याचा साथीदार निरुपदी कड (22, बेळगाव) यालाही अटक केली आहे. कामाक्षी उ•ापनोवा (30) असे मयत तऊणीचे नाव आहे.
गॅरेजमध्ये जुळे प्रेमसंबंध
मयत तऊणी कामाक्षी उ•ापनोवा आणि प्रकाश चुंचवाड हे दोघेही पर्वरीत एक गॅरेज चालवत होते. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवासपूर्वी मयत कामाक्षीने प्रकाश याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्यांच्यामधील संबंध दुरावले. त्यामुळे हैराण झालेल्या प्रकाशने त्या तऊणीला त्रास देण्यास सुऊवात केली. दोन दिवासपूर्वी कामाक्षीने प्रकाशविऊद्ध म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी म्हापसा पोलिसांनी प्रकाशकडून तिला आपण यापुढे त्रास देणार नाही, असे लिहूनही घेतले होते. नंतर त्याला सोडण्यात आले होते.
त्या दिवसापासूनच कामाक्षी बेपत्ता
प्रकाशला पोलिसांनी ज्या दिवशी सोडले त्या दिवसापासून कामाक्षी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दि. 30 ऑगष्ट रोजी पर्वरी पोलीस स्थानकात नोंदविली होती. पोलिसानी प्रकाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सुरवातीला काहीही सांगण्यास नकार दिला पण नंतर पोलिसी हिसका दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली.
दुसऱ्याशी सूत जुळवल्याने केला खून
कामाक्षीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रकाशने तिचा पर्वरीतील एका फ्लॅटवर खून करून नंतर मृतदेह आंबोली घाटात नेऊन खोल दरीत टाकला. तिने माझ्याशी प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी सूत जुळविले होते म्हणून मी हे कृत्य केले असे, त्याने पोलिसांना सांगितले आहे. अधिक तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, पोलीस निरीक्षक अनंत गावकर व पोलीस आणि फॉरेन्सिक पथक संशयिताला घेऊन आंबोली घाटात गेले असून तेथे तऊणीचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सायंकाळी निरुपदी कडला अटक
या प्रकरणात सायंकाळी उशिरा निऊपदी कड (22) या प्रकाशच्या साथीदाराला अटक करण्यात आली. आंबोली रेस्क्मयू टीमच्या मदतीने 70 फुट खोल दरीत टाकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. ज्या दिवशी खून केला त्याच रात्री मृतदेह गाडीतून आणून आंबोली घाटात फेकला. पोलिसांनी आंबोलीत शोध मोहीम सुरू केली तेव्हा आंबोलीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने मृतदेह दरीतून वर काढण्यास खूप अडचणी आल्या. शेवटी आंबोली रेस्क्मयू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात ठेवण्यात आला आहे. असे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले.
गोवा हे आता ‘मर्डर डेस्टिनेशन’ : युरी
गोव्यातील भाजपा सरकारच्या कुशासनामुळे गोवा हे आता मर्डर डेस्टिनेशन झाले आहे. दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. मुख्यमंत्र्याकडून आता कोणतीही आशा नसल्याने गोव्याच्या राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती आपण करतो, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. राज्यपालांनी नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. पोलीस विभागात कर्मचारी आणि साधन सामुग्रीने सुसज्ज नाही. पोलीस भरती प्रक्रियेत थेट राजकीय हस्तक्षेप होत असून त्यामुळे भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्dर्रावृत्तीचे लोक पोलीस खात्यात भरती होत आहेत. गोव्यात पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असलेले 72 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे चित्र चिंताजनक आहे असे युरी आलेमाव यांनी सांगितले.









