‘स्वदेशी मेला’मध्ये प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा बालाघाटकडे रवाना
कोल्हापूर :
केंद्र शासनाच्यावतीने मध्यप्रदेशातील बालाघाट येथे देशातील सर्व राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘स्वदेशी मेला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शिवकालिन मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडाविण्यासाठी पाडळी खुर्द येथील श्रीमंतयोगी मर्दानी आखाड्याचे कलाकार बालाघाट येथे रवाना झाले आहेत.
या आखाड्याकडून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले जाणार आहे. वस्ताद पींडत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक योगेश भैरू गुंजिकर यांच्यासह 25 मावळे व रणरागिणींचा समावेश आहे. यामध्ये बालमावळेही आपली कला सादर करणार आहेत. बालाघाट येथे होणाऱ्या स्वदेशी मेला या कार्यक्रमामध्ये शिवकालिन मर्दानी खेळाचा थरार रंगणार आहे. शिवकालिन चित्तथरारक प्रात्याक्षिकांसह पारंपरिक लेझिम व राज्याच्या संस्कृतिचे दर्शन घडविले जाणार आहे.
बुधवार दि.4 ते 10 डिसेंबर दरम्यान स्वदेशी मेला कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात शुक्रवार दि.6 ते 8 डिसेंबर दरम्यान श्रीमंतयोगी मर्दानी आखाड्यातर्फे लाठीकाठी, तलवारबाजी आदी चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवविली जाणार आहेत.








