मराठा को-ऑप. बँकेची निवडणूक उद्या
बेळगाव : येथील मराठा को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. 22 रोजी होणार आहे. बँकेचे हित लक्षात घेऊन सुनील अष्टेकर व शरद पाटील यांनी सामान्य गटातून आणि मोतेश बार्देशकर यांनी मागास ब गटातून माघार घेत सत्ताधारी पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे. मतपत्रिकेमध्ये नाव, चिन्ह असले तरी शिक्का मारून आपले मत वाया घालू नका, असे आवाहन अष्टेकर, पाटील व बार्देशकर यांनी केले आहे. सुनील अष्टेकर व शरद पाटील यांनी सामान्य गटातील उमेदवारांना तर बार्देशकर यांनी विश्वजित हसबे यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. मराठा बँकेच्या विद्यमान सत्ताधारी गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचे आभार मानले आहेत.









